उठा उठा दिवाळी आली
Suddenly Diwali came
उठा उठा दिवाळी आली,
धनत्रयोदशीने सुरुवात झाली
आजच्या दिवशी करा यमदीपदान,
आज असतो धन्वंतरीला मान
उठा उठा दिवाळी आली,
अभ्यंगस्नानाने सुरुवात झाली
असते मग नरक चतुर्दशी,
लक्ष्मीपूजनाने सांगता अशी
उठा उठा दिवाळी आली,
बलिप्रतिपदेने सुरुवात झाली
दीपावली पाडवा मुख्य दिन,
या दिवशी असते गोवर्धन पूजन
उठा उठा दिवाळी आली,
भाऊबीजेने सांगता झाली
होतो कार्तिक मासारंभ,
पेटवा आपल्या आनंदाचा सुंभ
। । दीपावली शुभेच्छा ।।
© दीपक केदू अहिरे, नासिक
No comments:
Post a Comment