name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): October 2023

कांदा उत्पादन आणि व्यापार व्यवसाय (Onion production and trading business)

कांदा उत्पादन आणि व्यापार व्यवसाय 
Onion production and trading business


Kanda utpadan ani Vyapar vyavasay

हवामान : 

  • कांदा पिकाला थंड हवामान पोषक असते. 
  • कांदा वाढीच्या सुरुवातीच्या काळात १० ते १५ अंश से. गाठ मोठी होत असताना १३ ते २४ अंश से. तापमान उपयुक्त ठरते. 
  • कांद्याच्या उत्तम वाढीसाठी रात्रीचे १५ ते २० अंश से. दिवसाचे २५ ते ३० अंश से. तापमान, ११ ते १२ तास स्वच्छ सूर्यप्रकाश व ७० ते ७५ टक्के आद्रता आवश्यक असते. 
  • जास्त पाऊस, उष्ण व अति दमट आणि ढगाळ हवामान कांदा पिकास हानिकारक असते.
जमीन : 
  • कांद्यासाठी उत्तम निचऱ्याची मध्यम ते मध्यम भारी जमीन निवडावी. हलक्या मुरमाड जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असेल तर उत्पादन चांगले येते. 
  • उत्तम वाढीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.० व जमीनीची क्षारता ०.५ ते १ टक्क्याच्या दरम्यान असावी. 
  • तथापि कांदा पीक तुलनेने अधिक सामू असणाऱ्या जमीनीतही येते.
जाती :   
  • अ) खरीप हंगामातील जाती :१) एन-५३ २) बसवंत-७८० ३) ऍग्रोफाऊंड डार्क रेड ४) भीमराज ५) अर्का कल्याण 
  • ब) रांगडा हंगाम : १) फुले समर्थ २) भीमा सुपर ३) भीमा रेड ४) भीमा शक्ती  
  • क) रब्बी आणि उन्हाळी हंगामातील जाती : १) एन-२-४-१ २) पुसा रेड ३) भीमा शक्ती ४) अरका निकेतन ( सिलेक्सन १३) ५) ऍग्रोफाऊंड लाईट रेड ६) उदयपूर -१०१ ७) पुसा माधवी 
  • ड) पांढऱ्या कांद्याच्या जाती :१)फुले सफेद२)भीमा शुभ्रा ३) भीमा श्वेता ४) ऍग्रोफाऊंड व्हाईट ५) पुसा व्हाईट राऊंड ६) पुसा व्हाईट फ्लॅट ७)पंजाब एस -४८ ८) पी.के.व्ही सिलेक्सन 
  • इ) पिवळ्या कांद्याच्या जाती : १) फुले सुवर्णा
लागवड : 

Kanda utpadan ani Vyapar vyavasay

  • सर्वसाधारण कांदा लागवड जवळ जवळ वर्षभर होत असली तरी खरीप, रांगडा, रब्बी हंगामात कांदा लागवड होते. 
  • खरीप हंगामात मे महिन्यात बी पेरून १५ जुलैपर्यंत रोपांची लागवड केली जाते. कांदा काढणीस ऑक्टो.- नोव्हे. महिन्यात तयार होतो. 
  • रांगडा हंगामात ऑगस्ट-सप्टें. महीन्यात बी पेरून रोपांची पुनर्लागण ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. 
  • रब्बी हंगामात ऑक्टोंबर- नोव्हेंबर महिन्यात बी पेरून रोपांची लागवड डिसे.-जानेवारी महिन्यात केली जाते. कांदा पोसण्याचा कालावधी उन्हाळ्यात येतो. म्हणून या लागवडीस उन्हाळ कांदा म्हणतात.
  • वेगवेगळया भागात कांद्याची लागवड विविध पद्धतीने करतात . काही भागात बी शेतात कायम जागी पेरून लागवड करतात. 
  • अनेक ठिकाणी गादी वाफ्यावर रोपे तयार करून पुनर्लागण करतात. रोपे सपाट वाफ्यात किंवा सरी वरंब्यावर करतात. 
  • काही भागात पात कापून लागवड करतात. रोपवाटिका तयार करून लागवड करणे ही प्रचलित व फायदेशीर पद्धत आहे.
पाणी व्यवस्थापन : 
  • सुरूवातीच्या काळात कांद्याच्या पिकाला बेताचे पाणी लागते. नंतर कांदा पोसण्याच्या काळात ४५ ते १०० दिवस नियमित पाणी आवश्यक आहे. 
  • कांदा पोसावयास सुरुवात झाल्यावर पाण्याचा ताण पडू देऊ नये. अनियमित पाणी पुरवठा झाल्यास जोडकांद्याचे प्रमाण वाढते.
खत व्यवस्थापन : 
  • कांदा पिकाला भरपूर सेंद्रिय खते देणे जरुरीचे आहे. जमिनीची मशागत करतेवेळी हेक्टरी ४० ते ५० गाड्या शेणखत द्यावे. 
  • खतांचे प्रमाण जमीन,हवामान,हंगाम यावर अवलंबून असले तरी सर्वसाधारण १०० कि. नत्र, ५०कि. स्फुरद, ५० कि. पालाश द्यावे. 
  • निम्मा नत्र म्हणजे ५० किलो पुनर्लागवडीच्यापूर्वी १ ते २ दिवस आधी द्यावा. ५० कि. स्फुरद व ५० किलो पालाश त्याच वेळी द्यावा. 
  • राहिलेला ५० कि. नत्र रोपांची शेतात पुनर्लागवड केल्यानंतर १ ते २ हप्त्यात, पहिला हप्ता पुनर्लागवड केल्यानंतर ३० दिवसांनी व दुसरा हप्ता पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. 
  • वरखते कांदा तयार होण्यास सुरुवात होण्यापूर्वी द्यावा.
किड नियंत्रण : 
  • कांद्यावर फुलकिडे (थ्रीप्स), कांद्यावरील माशी, कंद किंवा खोड कुरतडणारी अळी (कट वर्म),फुले किंवा फळे कुरतडणारी अळी, तांबडे कोळी (माईटस), कांद्यावरील कोळी, वाळवी या किडी येतात.
  • फुलकिड्यांमुळे कांद्याचे ३० ते ४० टक्के उत्पादन घटते. फुलकिड्यांना वर्षभर खाद्य मिळत असल्यामुळे अनेक भाज्यांवर या किडी जगतात. या किडींचा जीवनक्रम तोडण्यासाठी प्रभावी औषधांची फवारणी करावी.
रोगनियंत्रण : 
  • कांदा पिकाचे किडीपासून जेवढे नुकसान होते त्यापेक्षाही रोगापासून जास्त नुकसान होते. 
  • कांदा पिकाच्या रोगाची वैशिष्टय जाणून घेतले तर नियंत्रण करण्यास सोपे जाते. 
  • कांदा पिकात मर रोग, काळा करपा, पांढरी सड, मूळकूज, जांभळा करपा, तपकिरी करपा, कंद व खोड कुजविणारे सूत्रकृमी, कोलेटोट्रीकम  करपा रोग, केवडा, काणी हे रोग येतात. 
  • कांदा साठवणीत मानकुज, काजळी हे रोग येतात. कांद्यावर विषाणूजन्य रोग येतात. लक्षणे ओळखून रोगावर यथायोग्य नियंत्रण मिळवावे.
काढणी : 
  • लागवडीनंतर जाती परत्वे आणि हवामानानुसार कांदा पक्व होऊ लागला की, नवीन पाने यायची थांबतात. 
  • पानातील अन्नरस कांद्यात उतरून कांदा घट्ट होऊ लागतो. पाने पिवळसर होऊ लागतात. 
  • कांद्याचा मानेचे भाग मऊ होतो. व पाने मानेजवळ वाकून जमिनीवर पडतात. 
  • खरिपाचा कांदा लागवडीनंतर १०० ते ११० दिवसात तयार होतो. 
  • कांदा काढल्यानंतर तो शेतात पातीसह ३-४ दिवस पडू द्यावा. पात कापल्यानंतर कांद्याची प्रतवारी करावी. 
  • चांगल्या प्रकारे प्रतवारी करून एकसारखा कांदा ग्राहकापर्यंत पोहचवला तर भाव चांगला मिळतो.
प्रक्रिया : 
  • कांद्याचे निर्जलीकरण, सलाड, कांद्याचे विविध पदार्थ (कांदाभजी, पोहे, पिठले), कांदा तेल, कांदा ज्यूस, कांदा लोणचे,  इ. प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात. 
  • महाराष्ट्रातील महिला मोठ्या कांद्याच्या चकत्या करून ऊन्हात कडकडीत वाळवतात. आणि मसाल्याच्या पदार्थात मिसळून बारीक करतात. ह्यालाच कांद्याचे निर्जलीकरण म्हणतात. 
  • कांद्याच्या प्रक्रियायुक्त  पदार्थाना बाजारात मोठी मागणी आहे.

Kanda utpadan ani Vyapar vyavasay

कांदा व्यापार व्यवसाय

  • महाराष्ट्रात कांदा व्यापार हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.
  • कायदेशीर आणि यशस्वी कांदा व्यापार व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक परवाने आणि परवानग्या मिळवणे महत्त्वाचे आहे. 
  • कांदा व्यापार सुरू करण्यासाठी काही आवश्यक पायऱ्या आहेत. त्यात व्यवसायाची उद्दिष्टे, लक्ष्य आणि आर्थिक अंदाजांची रूपरेषा देणारी तपशीलवार योजना विकसित करून व्यवसायास सुरुवात करावी
  • तुमच्या कांदा व्यापार व्यवसायासाठी स्थान निश्चित करा त्यात तुम्ही कांदा उत्पादक प्रदेश किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात, भागात सुरू करण्याचा विचार करू शकता.
  • तुमचा कांदा व्यापार व्यवसायाची कायदेशीर संस्था म्हणून नोंदणी करा. त्यात वैयक्तिक मालकी, भागीदारी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या प्रमाणानुसार  नोंदणी करून घ्यावी. 
  • या व्यवसायासाठी कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) आणि कर वजावट आणि संकलन क्रमांक (टॅन) क्रमांक हेतूंसाठी अर्ज करावा.  
  • कांदा व्यापार करण्यासाठी तुम्हाला आवश्यक परवाने आणि परवानग्या घेणे आवश्यक आहे. 
  • त्यात दुकान आणि आस्थापना परवाना, बाजार समिती परवाना, जीएसटी नोंदणी करावी.
  • थेट शेतकऱ्यांकडून किंवा घाऊक बाजारातून कांदा खरेदी करण्यासाठी विश्वसनीय स्रोत निर्माण करावा.
  • संभाव्य खरेदीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विपणन धोरण विकसित करून आपल्या कांदा व्यापार व्यवसायासाची ब्रँड जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. 


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...