name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): August 2023

हायड्रोपोनिक शेती (Hydroponic Farming)

हायड्रोपोनिक शेती
Hydroponic Farming

हायड्रोपोनिक शेती (Hydroponic Farming) म्हणजे पाण्यातून वाढ झालेली पिके हा होय. सरळ अर्थ म्हणजे मातीविना शेती होय. ह्या तंत्रामुळे वनस्पती मातीत न लागता, पाण्यामध्ये आवश्यक अन्नद्रव्यांसह वाढते.


Hydroponic
हायड्रोपोनिक शेती

सद्यस्थितीत सुपीक जमीन होण्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. सुपीक मातीही उपलब्ध होत नाही. अशा वेळी हायड्रोपोनिक शेती पद्धतीचा वापर वरदान ठरत आहे. हि शेती पाणी, वाळू किंवा खडी या माध्यमातून केली जाते.

या तंत्राचा वापर करून आपण गच्चीवर, छतावर किंवा जेथे जमिनीची कमतरता आहे अशा ठिकाणी हि शेती करू शकतो.

हायड्रोपोनिक शेतीत पाणी, प्रकाश व पोषक तत्व या तीन महत्वाच्या गोष्टींची गरज आहे. या पद्धतीत पाण्याची ९० टक्केपर्यंत बचत होते. केवळ १० टक्के पाणी लागते. रोग व किडींमुळे होणारा प्रादुर्भाव होत नाही. पारंपारिक शेतीपेक्षा ३-४ वेळा जास्त उत्पादन घेता येते.
    

हायड्रोपोनिक पद्धतीने सिमला मिरची, कोबी, बटाटा,कारले, काकडी, पालक, टोमॅटो, धणे, मिरची, तुळस, गुलाब आणि इतर अनेक फळभाज्या वाढवता येतात.
    

हायड्रोपोनिक शेती ही भविष्यातील शेतीची आधुनिक पद्धत आहे. वातावरणाचे तापमान, आद्रता इ. नियंत्रण केल्यास ह्या शेतीत चांगले यश मिळते. पाण्यातून वनस्पतीसाठी आवश्यक असलेले अन्नद्रव्य दिल्यास उत्पादन वाढते.



hydroponic sheti
हायड्रोपोनिक शेतीत उत्पादन 

1.पाणी फिल्म प्रणाली (Nutrient Film Technique):

या पद्धतीत, वनस्पती पाण्याच्या वरच्या पातळीवर असते व पाण्यातून अन्नद्रव्य मिळवते.

2. फोट पद्धत (Wick System):

वनस्पतीच्या मूळांपर्यंत अन्नद्रव्य जाऊन पोहचविण्यासाठी विक पद्धत वापरता येते.

3. ड्रिप पद्धत (Drip System):

या पद्धतीत, प्रत्येक वनस्पतीला ड्रिप्सद्वारे म्हणजेच ठिबकद्वारे अन्नद्रव्य पुरविण्यात येते.


हायड्रोपोनिक शेतीचे प्रकार :

केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना हायड्रोपोनिक शेतीसाठी अनुदान मिळते. राज्यनिहाय अनुदानाची रक्कम वेगवेगळी आहे. महाराष्ट्र शासनाने चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक तंत्राचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले आहे
    

या पद्धतीत पीव्हीसी पाईपमध्ये रोपांची लागवड केली जात असून वरील बाजूस छिद्र केले जातात. आणि त्या छिद्रांमध्ये रोपे लावतात.
    

ह्या तंत्राच्या मदतीने आपण वातावरणाचे बदल, गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ अशा संकटांशी सामना करणारी शेती विकसित करू शकतो. त्यासाठी हायड्रोपोनिक तंत्र हे एक उत्तम पर्याय ठरू शकते.


© दीपक केदू अहिरे, 

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...