name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): स्मरण वडिलांचे...(Father's memory)

स्मरण वडिलांचे...(Father's memory)

स्मरण वडिलांचे 
Father's memory



आज आहे फादर्स डे,

म्हणून नाही आठवण

तर तुमच्या प्रेमाची,

माझ्या मनात साठवण

माझे तुम्ही पप्पा,

बापू तुम्ही शिक्षकांचे

तुमच्यासारखे भाषण,

मला नाही जमायचे


कुठल्याही विषयाची,

तुम्हाला हाेती जाण

बाेलायला लागले तर,

वेळेचं नव्हतं भान

आदर्श शिक्षक,

म्हणून तुम्ही मिरवली शान

साधेपणात तुम्ही जगले,

पप्पा आमचे महान

कमाई तुमच्या माणूसकिची,

हीच आमची शिदाेरी

र,सदैव स्मरणात राहतील,

हीच तुमच्या कार्याची पावती


© दीपक केदू अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...