name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): स्व- निर्मिती (self-creation)

स्व- निर्मिती (self-creation)


स्व- निर्मिती 
Self-Creation 




सर्वोच्च होण्यासाठी तुम्ही, 

स्वतःच स्वतःची करा पुनर्निर्मिती, 

स्वतःच एक आकृती व्हा,

हाडाचे कलावंतासाठी करा निर्मिती...


कुठे नी कसं प्रकटीकरण,

काय झाकावं जागरूकता महत्वाची,

आपला पेहराव,देहबोली, 

यावर गरज पूर्णपणे नियंत्रणाची...


जिथे ज्या भावनेची गरज

त्या भावनेचं करा प्रकटीकरण,

लवचिकता अंगी बाणवा

लवचिक व्यक्तिमत्त्व करा धारण...


तुमच्या व्यक्तिमत्वाचा 

आरसा तुम्हीच बना,

इतरांना काय वाटतं

हे स्वनजरेतून जाणा...


© दीपक केदू अहिरे, नाशिक





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...