धाडसdare
कृतीच्या मैदानात बेधडक
उतरण्यासाठी धीटपणा हवा,
धीटपणा आत्मविश्र्वासातून प्राप्त
तेव्हा होतो यशाचा गवगवा...
काहीच न करणे यापेक्षा
काही करून चुकणे चांगले,
घाबरण्यापेक्षा धाडसीपणा उत्तम
लोक काय म्हणतील आपले...
तुमची किंमत तुम्ही
धीटपणे सांगायला हवे,
मागणाऱ्याला सारं मिळतं
हे सामर्थ्य तुम्हास लाभावे...
धीटपणे सामोरं जाण्याऱ्याला
संधी मिळत असते,
संकटाला सामोरं जाण्याचा धीटपणा
धाडसी बनवत जाते...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा