name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): माझा शेतकरी राजा (My Farmer King)

माझा शेतकरी राजा (My Farmer King)

माझा शेतकरी राजा
My Farmer King


My farmer king


माझा शेतकरी राजा, 

पिकवताे घामातून माेती

तरीही हाेतेे वाताहत, 

कष्टाची होती माती


माझा शेतकरी राजा, 

राजा असून उपाशी

टाळूवरचे लाेणी खाता, 

काही खातात तुपाशी


माझा शेतकरी राजा, 

जागाेजागी भरडताे

फाटकेच वस्त्र लेवून, 

मन मात्र माेठे करताे


माझा शेतकरी राजा, 

बदल आता घडवताे

सरकारी याेजनांमुळे, 

थाेडा पुढे सरकताे

© दीपक अहिरे, नाशिक



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...