रक्तदान
Blood Donation
रक्तदान हे एक
महान दान,
रक्तदात्याला मिळताे
जगात श्रेष्ठ मान...
रक्तदान करायला
असावा निराेगी रक्तदाता,
रक्त देवून वाचवा जीवन
हाेतात तुम्ही त्यावेळी त्राता..
रक्तदान करा
शिबीरात स्वेच्छेने,
त्रास व इजा हाेत नाही
रक्तदान केल्याने..
भारतात हाेते केवळ
सहा टक्के रक्तदान,
रक्त न मिळाल्यामुळे
वाढतात मृत्यूचे प्रमाण..
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा