name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): किर्ती (Fame)

किर्ती (Fame)

किर्ती
Fame

Fame

तुमच्या किर्तीनुसारच लोक 

तुमच्यावर विसंबून राहतात,

किर्तीच वाढवते वैभव

किर्तीनुसारच लोक विश्वास ठेवतात...


किर्तीमान होण्यासाठी, 

उद्दीष्ट एक ठरवा,

त्या दिशेने करा विलक्षण कष्ट

तेव्हा निर्माण होईल दबदबा...


कीर्ती करते तुमच्यासाठी 

संरक्षक ढालीचं काम,

कीर्तीच तुम्हाला मिळवून देते, 

यशाचं अनोखं नाम...


कीर्ती मिळवण्यापेक्षा, 

जतन करनं कठीण असतं,

प्राणपणाने करावे रक्षण 

सातत्याने भर टाकत राहायचं असतं...


© दीपक केदू अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...