लक्ष्यभेद Target differentiation
शक्तीचं संवर्धन करून
प्रेरणा,ऊर्जेच्या बलस्थानी व्हावं एकाग्र,
तेव्हाच यश गाठता येते
नाहीतर होतो व्यवधनाने व्यग्र...
ध्येयाच्या दिशेने व्हा कार्यरत,
आतल्या आत एकांत शोधावा,
हेच असतं यशाचं रहस्य
ठरवूनच लक्ष्यभेद साधावा...
सहाय्य घेत नुसतं पसरू नका
मदत घ्या शक्तिकेंद्राची,
पसरल्याने बळ व शक्ती होते खर्च
गरज आहे घट्ट राहण्याची...
एकच बाण एकावेळी
दोन लक्ष्यांचा घेत नाही वेध,
मन व बाणाची साधावी एकतानता
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा