ताण आणि तणाव
Stress and Tension
मोठेपणाचा ध्यास आणि हव्यास,
शेवटपर्यंत सुरू असतो,
तणाव करतो माणसाला उद्धवस्त,
एकटेपणात असह्य होतो...
ताणतणाव निर्माण होणारी कारणं,
शोधून ती टाळावीत,
छंद,संगीत,आवडी निवडी,लेखन,
आनंदाने जपावित...
धावण्याच्या बेभान शर्यतीत,
माणसं दूर फेकली जातात,
संकट,अपयशात मिळतो ताण,
पहावा आनंद निसर्गात...
जे नाही आपलं, जे गेलं,
त्यावर शोक का करावा,
शुल्लक गोष्टीसाठी ताण,
मनात का व्यापून उरावा...
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा