चिंता
Worry
प्रत्यक्षात काम करण्यापेक्षा,
कामाच्या चिंतेने माणसं त्रस्त,
वर्तमान सोडून भविष्याची चिंता,
चिंतेने पोखरतात फक्त...
प्रत्येक गोष्ट छोटी असते,
चिंताच बनवते तिला मोठी,
आयुष्य चिंतेत घालवतात,
घडल्याच नाहीत अशा गोष्टी...
थोडी चिंता किंवा हुरहूर,
ही नैसर्गिक मनात असते,
मनाची ही अस्वस्थताच,
नवनिर्मितीची प्रेरणा बनते...
चिंता करायची असेल तर
साऱ्या विश्वाची करा,
वाटेल तुमची चिंता छोटी,
चिंतामुक्तीचा हा मार्ग खरा..
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा