श्री गुरूदत्ता...
Shri Gurudatta
रूप तुझे,
सात्त्विक निर्विकार,
श्री गुरूदत्ता,
तू भक्तांचा आधार...
रूप तुझे,
देते बळ मानसिक,
कसे वागावे,
हे जाणतो भाविक...
रूप तुझे,
श्री विष्णूपासून जन्मले,
तेजाेमयी त्रिमुख,
वैराग्यसूचक झाले...
रूप तुझे,
धावणारे चटकन हाकेला,
दत्तस्मरणाने,
बल येते उपासनेला...
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा