आला साेसाट्याचा वारा...
आला साेसाट्याचा वारा,
घेऊन पाऊस आणि गारा,
काेसळतात चिंब धारा...
आला साेसाट्याचा वारा,
लाेंबकळल्या विजेच्या तारा,
आसमंत भिजला त्यात सारा...
आला साेसाट्याचा वारा,
त्यात गारपिटीचा मारा,
शेतीला झाला ताे सहारा...
आला साेसाट्याचा वारा,
चढला उन्हाने ताे पारा,
पर्जन्याने पाडला फवारा...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा