बालपणीच्या आठवणी
बालपणीचा पाऊस
मज्जा वाटे मनात,
शाळेला मिळे सुट्टी
जायचाे आम्ही रानात...
बालपणीचा चंद्र
गाेष्टीतून पाहायचाे,
गाेष्ट ऐकली की
कल्पनेने उभी करायचाे...
बालपणीचा वारा
करायचा गाेल नृत्य,
पाेरं नुसती खाेडकर
व्हायचाे आम्ही वात्र्य...
बालपणीचे तारे
लुकलुकत आकाशात,
सकाळ होताच गुडूप
कुतूहल बाल जगतात...
@ दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा