'वात्सल्य' आई
करते जतन,
प्रेमाने जाणते
ती आपले मन...
चांगल्या गोष्टीना
वडील करतात जतन,
हेच आपल्या
सर्वस्वाचे धन...
चिमणी घेते
भरारी आकाशात,
स्वप्नांचे आकाश
धरून ठेवते पंखात...
झाडं करतात
जतन धरतीला,
जपा आपल्या
अनमोल निसर्गाला...
काही ना काही
करावे आपण जतन,
टवटवीत राहील
आपलं मन...
संवर्धनाने गुण
वाढीस लागतात,
चांगल्या सवयी
जोपासल्या जातात...
@ दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा