भाऊबीज
Bhaubeej
भाऊबीजेचा सण विविध प्रांतात
वेगवेगळया नावाने ओळखतात,
भावाच्या दीर्घायुष्य व आरोग्यासाठी
हा दिवस साजरा करतात...
भाऊबीज हा दिवाळीमधील
एक महत्वाचा सण,
भाऊबीजेच्या दिवशी बहिणीकडे,
स्वतःच्या घरी होते गोडधोड भोजन...
भाऊबीज म्हणजे बहिण भावाच्या
उत्सव असतो प्रेमळ नात्याचा,
भावा-बहिणीने काढावी एकमेकांची आठवण
दिवस असतो विचारपूस करण्याचा...
भाऊबीजेमुळे मनातील द्वेष निघून
बंधुभावनेची कल्पना जागृत होते,
बहिणीकडून ओवाळून घेतल्याने
व्यावहारीक व अध्यात्मिक लाभप्राप्ती होते...
। । दीपावली शुभेच्छा ।।
© दीपक केदू अहिरे, नासिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा