तू तीळ, मी गूळ,
एकमेकात मिसळला तिळगूळ...
तिळगूळ हे प्रेमाचं प्रतीक,
गोड बोलण्याचं आता शीक...
तू तीळ, मी गूळ
दोन्ही चाकं संसाराची,
परस्परांच्या सहमतीने
गाडी आपली हाकलायची...
तू तीळ, मी गूळ
स्नेहभाव जपावा,
तरच आपल्या जीवनात
वाजेल मधुर पावा...
तू तीळ, मी गूळ
मकरसंक्रांती व्हावी साजरी,
आपुलकीचा झरा
तू धरावा माझ्या शिरी...
तू तीळ, मी गूळ,
एकमेकात मिसळला तिळगूळ...
@ दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा