शांतता...
Peace
काेणत्याही क्षेत्रात
शांतता बाळगणे माेलाची,
थोडी शांतता पाळली तर
भाग हाेते सुविचाराची
समजूतदारपणा हेच
शांततेचे दुसरं नाव,
शांतता महत्त्वाचे अस्त्र,
बदलते आयुष्याचं गाव
शांतता न पाळणारी
वळणा वळणावर अपघातग्रस्त,
सर्व काही लगेच हवे,
घाईघाईमुळे हाेतात ते त्रस्त
प्रवास आयुष्याचा,
शांततेने माणसं हाेतात यशस्वी,
प्रगतीसाठी दाेन पावले मागे
घेणारी माणसं तपस्वी
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा