name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): वाजे महाराष्ट्राचा डंका (waje Danka of maharastra)

वाजे महाराष्ट्राचा डंका (waje Danka of maharastra)

वाजे महाराष्ट्राचा डंका 
(waje Danka of maharastra)
Maharashta din

वाजे महाराष्ट्राचा डंका 
कामगार ही आमची शान, 
महाराष्ट्र हे वैभवशाली राज्य 
येथे नररत्न, संताची खाण... 

वाजे महाराष्ट्राचा डंका
सर्वच क्षेत्रात आगेकुच आमची,
महाराष्ट्राने सदैव जपली
सामाजिक अस्मिता कायमची...

वाजे महाराष्ट्राचा डंका 
शेती व उद्योग आमचे बलस्थान,
आजही आहे, पुढेही टिकवू
आमचे हे मानाचे स्थान...

वाजे महाराष्ट्राचा डंका
आम्ही जपू संस्कृती परंपरा,
सुजलाम, सुफलाम महाराष्ट्र 
नटवू हिरवाईने ही धरा...

© दीपक केदू अहिरे, नाशिक 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...